हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजसाधुबोध झाला📤 Share♡ Favoriteसाधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥ कापुराची वात उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्ये विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→