समाधान चित्ताचें चरणा आलिंगन
समाधान चित्ताचें चरणा आलिंगन ।
पायावरी मन स्थिरावलें ॥१॥
जैसें केलें तैसें घालूं लोटांगणा ।
करूं प्रदक्षिणा नमस्कार ॥२॥
प्रार्थितों मी तुज राहें माझें पोटीं ।
हृदयसंपुटीं देवराया ॥३॥
क्षेम आलिंगन दिली पयीं मिठी ।
घेतलीसे लुटी अमूप हो ॥४॥
तुका म्हणे आतां आनंदीआनंद ।
गाऊं परमानंद मनासंगें ॥५॥