हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजसमाधी हरिची📤 Share♡ Favoriteसमाधी हरिची सम सुखेंविण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । ऐका केशवराजे सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धिसिद्धिनिधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→