सांग सांग सांग राधे सांग ना ग
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणीची गाठ कशी सुटली ग
घागर घेऊन पाणियाशी जाता
पाणियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता
पाणियाशी गं यमुनेशी गं
अग हसली....
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणीची गाठ कशी सुटली ग
दही दूध घेऊन बाजाराला जाता
बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता
बाजाराला गं मथुरेला गं
अग हसली...
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणीची गाठ कशी सुटली ग
एका जनार्धनी राधा गौळण
गौळण गेली कृष्णाला शरण
नव्या युगाची नवरी नटली ग
तुझ्या वेणीची गाठ कशी सुटली ग