सांगा मी काय करू,
भक्ती करू का पोट भरू ।। धृ ।।
भक्ती म्हणते चाल पुढे,
संसार म्हणतो ये इकडे,
हे करू का ते करू ... ।। १ ।।
भक्ती विना देव दिसत नाही,
पैसाविना संसार चालत नाही,
कोणता मी मार्ग धरू ... ।। २ ।।
भक्ती करून जो पोट भरे,
तुका म्हणे त्याला मोक्ष मिळे,
वेड्या मानवा नको धाबरू ... ।। ३ ।।