शंकराला माझ्या महादेवला आवडते बेलाचे पान पान ।।धृ।।
शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा
कपाळी चंद्र शोभे छान ।।१।।
शंकराच्या जटामधुनी वाहे दूधगंगा
हातात डमरू शोभे छान ।।२।।
शंकराच्या मांडीवरती पुत्र गणपती
संगे पार्वती शोभे छान ।।३।।
शंकर बसले तप करायला
बाहेर नंदी शोभे छान ।।४।।