शंख चक्र गदा रुळे वैजयंती
शंख चक्र गदा रुळे वैजयंती ।
कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ॥१॥
मस्तकीं मुकुट नवरत्नहार ।
वरी पीतांबर पांघुरला ॥२॥
रत्नहिरेजडित कटीं कडदोरा ।
रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥
जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका ।
लाचावला तुका भेटीसाठीं ॥४॥