हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजत्रिगुण असार📤 Share♡ Favoriteत्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→