त्रिवेणीसंगमीं
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थ भ्रमि ।
चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥१॥
नामासी विमुख तो नर पापिया ।
हरीविण धांवया न पवे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामें तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥