अभंग→विठ्ठलतुझे रूप पाहता देवा♡ Favoriteतुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा ।।धृ।। हे तो वाचे बोलवेना काय सांगू नारायणा ।।१।। जन्मो जन्मीचे सुकृत तुझे पायी रमले चित्त ।।२।। जरी योगाचा अभ्यास तेव्हा तुझा निजध्यास ।।३।। तुका म्हणे भक्त गोड गाऊ हरीचे गीत ।।४।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→