तुला डोक्यावर घेईन, प्रेमे नाचवीत आणीन
देवा गजानना तुजला, छान मकरात बसवीन ॥धृ॥
सरला आषाढ श्रावण, आला भाद्रपद मास
तुझ्या दर्शनाची देवा, ओढ लागे या जीवास
एका वर्षाने येईन, गेला होतास सांगून ॥१॥
होता तुझं हे आगमन, झालं घराचं मंदिर
तुझं करण्या पूजन, मन झालं हे अधीर
दुर्वा फुलं हे अर्पून, मनोभावे मी पुजिन ॥२॥
सुख समृद्धी हे भक्ता, हेची मागणं एकदंता
तूच सकलांचा दाता, टाकी मिठूनी चिंता
गुणगान तुझं गाता, मन गेलं हे आनंदुनी ॥३॥