तुम्ही देव पाहिला का
तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का।
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का॥
त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान।
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का॥ १ ॥
त्याने भजन केले निर्माण असा आहे तो र भगवान।
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का॥ २ ॥
तुका म्हणे माता पिता त्यांच्या चरणी ठेवितो माथा।
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का॥ ३ ॥