हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजवेदशास्त्रपुराण📤 Share♡ Favoriteवेदशास्त्रपुराण श्रुतींचें वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरीविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→