विनविजे ऐसें भाग्य नाहीं देवा ।
पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणे पत्र लिहिलें आवडी ।
पार नेणें थोडी मति माझी ॥२॥
जेथें वेदां तुझा न कळेचि पार ।
तेथें मी अपार काय वानूं ॥३॥
जैसे तैसे माझे बोल अंगिकारी ।
बोबड्या उत्तरी गौरवितो ॥४॥
तुका म्हणे विटेवरी जीं पाऊलें ।
तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥५॥