अभंग→विठ्ठलया सुखामुळे देव वेडावला♡ Favoriteया सुखामुळे देव वेडावला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला ॥धृ॥ धन्य धन्य संत सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ॥१॥ सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी मुक्ति मुक्ति दाटी ॥२॥ एका जनार्दनी पाड नाही सुखा, म्हणोनी देव भुलले देखो देहा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला ॥३॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→