॥ गवळण ॥
यशोदे तुझा लाडका
मुरलीने मारी हाका... ॥ धृ ॥
मुरली वाजवी पंढरपुरी
तेथे सारे वारकरी
पुंडलिक भक्त सखा... ॥ १ ॥
मुरली वाजवी अयोध्या नगरी
मारियेला रावण वैरी
बिभीषण दिली लंका... ॥ २ ॥
एका जनार्दनी तो श्री हरी
यशोदेचा कृष्ण मुरारी
पांडवांचा प्राण सखा... ॥ ३ ॥